उमेद ग्रामीण जीवनोन्नती प्रवेगक (URJA)
ही संस्था महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक आणि नेतृत्व विकासासाठी कार्यरत आहे.
संस्थेची पार्श्वभूमी :
स्थापना: 1982 साली, समाजातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी.
उद्देश: नेतृत्व, व्यवस्थापन आणि सामाजिक परिवर्तनासाठी सक्षम व्यक्ती तयार करणे.
ठिकाण: केशव सृष्टी कॅम्पस, उत्तन, भायंदर (पश्चिम), ठाणे.
‘अटल इनोव्हेशन मिशन’ (AIM) हा भारत सरकारचा देशात नवसंशोधन (Innovation) आणि उद्योजकतेची (Entrepreneurship) संस्कृती वाढवण्यासाठीचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाचे Innovation Hubs, Grand Challenges, Start‑ups आणि Self‑Employment Initiatives यांना प्रोत्साहन देण्यासाठी AIM एक प्रभावी व्यासपीठ म्हणून काम करते.
‘बिझनेस इनक्युबेटर’ या संस्था उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मार्गदर्शन, प्रशिक्षण, वित्तीय सहाय्य आणि नेटवर्किंग पुरवतात.
त्यांचा उद्देश म्हणजे स्टार्ट‑अप्सना सक्षम करणे, त्यांचा विकास वेगवान करणे आणि टिकाऊ व्यवसाय मॉडेल तयार करणे.
नवसंशोधनाला चालना
देशभरात नवकल्पना आणि संशोधनाला प्रोत्साहन
उद्योजकतेचा विकास
तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम करणे
इनक्युबेशन सेंटर्सची स्थापना
नवीन स्टार्ट‑अप्सना मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध करून देणे
स्केल‑अप सपोर्ट
उत्कृष्ट इनक्युबेशन सेंटर्सना अधिक सक्षम करण्यासाठी निधी आणि मदत
ही संस्था NITI Aayog अंतर्गत स्थापन झालेली आहे आणि Atal Innovation Mission (AIM) चा भाग आहे. AIC‑RMP चे मुख्य काम म्हणजे ग्रामीण आणि निमशहरी भागातील नवउद्योजकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि निधी मिळवून देणे.
उमेद हे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY‑NRLM) अंतर्गत सन २०११ पासून महाराष्ट्रात राबवले जात आहे.
ग्रामविकास विभागांतर्गत स्थापन झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढणे हा आहे.
आज हे अभियान राज्यातील ३४ जिल्हे, ३५१ तालुके आणि सर्व ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असून, सुमारे ७१ लाख कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करत आहे.
उमेद अभियानाद्वारे महिलांचे स्वयंसहाय्यता गट (SHG), ग्रामसंघ, प्रभागसंघ आणि उत्पादक गट मजबूत करून त्यांना वित्तीय सेवा, कौशल्य विकास, उद्योजकता, शाश्वत उपजीविका आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो.
भारत सरकारचे हे एक प्रमुख मंत्रालय आहे जे खेड्यांचा विकास आणि गरिबी निर्मूलनासाठी कार्य करते.
या मंत्रालयाचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान सुधारणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे.
मनरेगा (MGNREGA)
ग्रामीण भागातील लोकांना १०० दिवसांचा हमी रोजगार देणे
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
गरीब कुटुंबांना मोफत घर उपलब्ध करून देणे
ग्राम सडक योजना (PMGSY)
खेड्यांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे
सहकार्य, उद्योजकता संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देत हरित व उज्ज्वल भविष्य घडविणे.
©2026 उमेद ग्रामीण जीवनोन्नती प्रवेगक (URJA). सर्व हक्क राखीव.
Vistaar Digital द्वारे विकसित आणि देखभाल केलेले