उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक

प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
img1

ऊर्जाबद्दल माहिती

उर्जा (URJA) – उमेद ग्रामीण जीवनोन्नती ॲक्सेलरेटर (UMED Rural Jeevanonnati Accelerator) हा महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील वाढत्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी
डिझाइन केलेला एक राज्यस्तरीय इनक्युबेशन कार्यक्रम (incubation programme) आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED-MSRLM) आणि अटल
इनक्युबेशन सेंटर – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (AIC-RMP) यांच्या भागीदारीत हा उपक्रम राबवला जात आहे. या उर्जा (URJA) उपक्रमांतर्गत ३६ महिन्यांच्या (3वर्ष) कालावधीत ग्रामीण भागातील किमान १५० सक्षम आणि शाश्वत उद्योगांचा शोध घेऊन, त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन (Incubate) आणि पूर्ण सहकार्य पुरवले जाईल.

उद्योजकांना साहाय्य करणे
0 +
ग्रामीण महिला संचालित उद्योगांसाठी
₹ 0 CR+
रोजगारांची निर्मिती करणे
0 +
उत्पन्नात वाढ साध्य करणे
0 %

आयोजित कार्यक्रम

उर्जाचे उपक्रम, कार्यक्रम व यशोगाथांची ठळक वैशिष्ट्ये

URJA Pamphlets Launch

ऊर्जा – महाराष्ट्रातील ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी एक नवीन अध्याय

दिनांक: ८ सप्टेंबर २०२६
स्थळ: RMP कार्यालय, प्रभादेवी, मुंबई

उर्जा – उमेद ग्रामीण जीवनोन्नती प्रवेगक या उपक्रमासाठी हा एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण ठरला. २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (RMP) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (AGM) महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ऊर्जा माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

img3

ग्रामीण प्रतिभा पोषकांसाठी राष्ट्रीय कार्यशाळा

दिनांक: २१ ते २३ एप्रिल २०२६
स्थळ: गुवाहाटी, आसाम

ग्रामीण प्रतिभा पोषकांसाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग घेतल्याचा एआयसी-आरएमपीला अभिमान आहे, ज्यातून महिला उद्योजकांच्या व्यवसाय व्यवस्थेला सक्षम करण्याच्या प्रयत्नांना हातभार लागला.

प्रतिभा पोषण संस्थेतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सेवा

प्रत्येक उद्योगाचे क्षेत्र, विकासाचा टप्पा व आवश्यकतांनुसार विशिष्ट प्रकारचे प्रतिभा पोषण साहाय्य ऊर्जातर्फे पुरविले जाईल.

विस्तार नियोजन

मार्गदर्शन व प्रत्यक्ष साहाय्य

वित्तिय साहाय्य

प्रशिक्षण व क्षमता बांधणी

बाजारपेठ व मूल्यसाखळीसंबंधी साहाय्य

औपचारीकरण व कायदेपालन

तंत्रज्ञान व नवनिर्मिती

देखरेख व अध्ययन

माहितीमहाजाल व भ्रमणध्वनी आधारित एमआयएस प्रणालीतून मागोवा