रचनाबद्ध प्रतिभा पोषण व व्यवस्था मजबुतीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण महिला संचालित आणि बचत गटांशी निगडीत उद्योगांना शाश्वत प्रगती, औपचारिकरण आणि बाजारपेठेशी जोडणी मिळवून देणे
ऊर्जा प्रकल्पाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
हा उपक्रम पूर्ण होईपर्यंत खालील परिणाम अपेक्षित आहेत:
एकूण १५० उद्योगांना या उपक्रमात समाविष्ट करून त्यांचे प्रतिभा पोषण केले जाईल आणि डिजिटल एमआयएस प्रणालीद्वारे त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेतला जाईल.
या उपक्रमांतर्गत साहाय्य मिळणारे उद्योग वार्षिक १५% किंवा त्याहून अधिक महसूल वृद्धी दाखवतील.
किमान १०० उद्योगांना शासकीय परवाने, नोंदणी, जीएसटी पूर्तता किंवा डिजिटल उपस्थिती मिळवून देऊन त्यांचे अधिक चांगल्याप्रकारे औपचारिकरण साध्य होईल.
सामाजिक संस्था विकास आणि गरीब कुटुंबांना वित्तिय व उपजीविका संधी उपलब्ध करून देऊन ग्रामीण दारिद्र्य कमी करणे हे दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे (डे-एनआरएलएम) उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रात जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) ३४ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यांमध्ये डे-एनआरएलएम राबवित आहे. महिला बचतगट, ग्राम संघटना आणि प्रभाग संघांच्या माध्यमातून जीवनोन्नती अभियानाने अनेक महिला संचालित व समाज निगडीत ग्रामीण व्यवसायांना वर येण्यास मदत केली आहे.
सुरुवातीच्या निव्वळ उपजीविकेच्या स्थितीतून पुढे जाऊन यांतील अनेक उद्योग आता अधिक वाढ साध्य करण्यास सक्षम झाले आहेत. परंतु अनेकदा त्यांना खालील क्षेत्रांत पद्धतशीर सहकार्याची गरज भासते:
ऊर्जा हा उपक्रम वरील गरजा पूर्ण करण्यासाठी एका व्यापक प्रतिभा पोषण आराखड्याच्या (इंक्यूबेशन मॉडेल) माध्यमातून तयार करण्यात आला आहे. हा उपक्रम बाजारपेठ व्यवस्था, भागीदारी आणि संस्थात्मक क्षमता बळकट करत असतानाच, प्रत्येक व्यवसायाच्या गरजेनुसार वैयक्तिक पातळीवर सहाय्य प्रदान करेल.
हा उपक्रम महाराष्ट्रातील बिगर-शेती ग्रामीण उद्योग विकासासाठी एका मार्गदर्शकाचे काम करेल. याद्वारे ग्रामीण व्यवसायांकरिता शाश्वत प्रगती, नफा वाढ, स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मिती आणि मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी एक नवा मार्ग तयार होईल.
©2026 उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक. सर्व हक्क सुरक्षित.
Vistaar Digital तर्फे निर्मिती व देखभाल