उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक

प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज

नियम व अटी

दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी अद्ययावत केले आहेत.

आमच्या सेवेचा उपयोग करण्यापूर्वी कृपया खालील नियम व अटी काळजीपूर्वक वाचून घ्या.

आकलन व व्याख्या

आकलन

ठळक अक्षरांत लिहिलेल्या शब्दांच्या अर्थाची व्याख्या खालील परिस्थितीला धरून केलेली आहे. एकवचनी किंवा अनेकवचनी कसेही असले, तरी खालील व्याख्यांतून समान अर्थबोध होणे अपेक्षित आहे.

व्याख्या

सदर गोपनीयता धोरणाला अनुसरून:

  • संलग्न संस्था म्हणजे एक असा घटक, जो एखाद्या पक्षकाराचे नियंत्रण करतो, त्याच्या नियंत्रणाखाली आहे किंवा त्याच्यासोबत समान नियंत्रण ठेवतो, जिथे ‘नियंत्रण’ म्हणजे ५०% किंवा त्याहून अधिक समभाग मालकी, भागभांडवल किंवा रोखे समजले जाईल, ज्यायोगे संचालक किंवा अन्य व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची नेमणूक होऊ शकते.

  • देश / राज्य म्हणजे भारत / महाराष्ट्र.

  • कंपनी (या नियम व अटींमध्ये ‘द कंपनी’, ‘आम्ही’, ‘आपण’ किंवा ‘आपले’ असा उल्लेख केलेला) याचा अर्थ होतो उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक.

  • उपकरण म्हणजे संगणक, भ्रमणध्वनी किंवी डिजिटल टॅब्लेट अशी गोष्ट, ज्याच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेतला जाऊ शकतो.

  • सेवा याचा अर्थ होतो संकेतस्थळ.

  • नियम व अटी (ज्यांचा नियम असाही उल्लेख केला आहे) यांचा अर्थ होतो सदर नियम व अटी, ज्यामध्ये संदर्भासाठी स्पष्टपणे अंगिकार केलेल्या कोणत्याही कागदपत्रांचा समावेश होतो, ज्यांतून तुम्हाला या सेवेत प्रवेश मिळतो किंवा त्याचा उपयोग करता येतो आणि ज्यांमध्ये तुम्ही व कंपनीमधील सेवेसंबंधीचा संपूर्ण करार समाविष्ट होतो.

  • तृतीय पक्ष समाज माध्यम सेवा म्हणजे तृतीय पक्षाने पुरविलेली कोणतीही सेवा किंवा मजकूर (ज्यामध्ये डेटा, माहिती, उत्पादने व सेवांचा समावेश होतो), जो प्रसिद्ध केलेला असून या सेवेतून जोडलेला किंवा उपलब्ध केलेला आहे.

  • संकेतस्थळ म्हणजे उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धकचे संकेतस्थळ: https://urjamaharashtra.in/

  • तुम्ही म्हणजे ती व्यक्ती, जी या सेवेचा लाभ घेतेय किंवा उपयोग करतेय किंवा लागू होत असल्यास एखादी कंपनी किंवा कायदेशीर घटक, ज्याच्या वतीने अशी व्यक्ती या सेवेचा लाभ घेतेय किंवा उपयोग करतेय.

स्पष्टीकरण

या सेवेचा उपयोग करतेवेळीचे हे नियम व अटी असून हा तुम्ही व कंपनीदरम्यानचा करार आहे. या सेवेच्या उपयोगासंबंधी प्रत्येक उपभोक्त्याचे अधिकार व कर्तव्ये या नियम व अटींमध्ये स्पष्ट केली आहेत.

या नियम व अटींचा तुम्ही स्वीकार करणे व त्याप्रमाणे वागणे यांवर तुमचा या सेवेमध्ये प्रवेश व त्याचा उपयोग अवलंबून राहील. या सेवेमध्ये प्रवेश घेणाऱ्या किंवा त्याचा उपयोग करणाऱ्या प्रत्येक अभ्यागत, उपभोक्ता व अन्य सर्वांना हे नियम व अटी लागू होतील.

या सेवेत प्रवेश करून किंवा त्याचा उपयोग करून तुम्ही या नियम व अटींच्या अधीन राहण्याचे मान्य करता आहात. यातील कोणतेही नियम व अटी तुम्हाला मान्य नसल्यास तुम्ही या सेवेचा उपयोग करू नये.

तुम्ही हे स्पष्ट करता की तुमचे वय १८ वर्षेपेक्षा अधिक आहे. वय वर्षे १८ पेक्षा खालील व्यक्तींना कंपनी या सेवेचा उपयोग करण्यास अनुमती देत नाही.

तुमचा या सेवेमध्ये प्रवेश व त्याचा उपयोग हा आमच्या गोपनीयता धोरणावरही अवलंबून असून त्यामध्ये आम्ही खाजगी माहिती कशी गोळा करतो, वापरतो किंवा इतरांना पुरवितो याचे वर्णन आहे. आमची सेवा वापरण्यापूर्वी कृपया आमचे गोपनीयता धोरण वाचून घ्यावे.

अन्य संकेतस्थळांच्या लिंक

तृतीय पक्षाची संकेतस्थळे व सेवांच्या लिंक आमच्या संकेतस्थळात असू शकतात, ज्यांची मालकी किंवा नियमन आमच्याकडे नाही.

कोणत्याही तृतीय पक्षाची संकेतस्थळे किंवा सेवांवर कंपनीचे नियंत्रण नसून त्यांवरील कोणताही मजकूर, गोपनीयता धोरणे किंवा पद्धतींची जवाबदारी कंपनी घेत नाही. तुम्ही याचीही नोंद घेता आणि मान्य करता की अशी संकेतस्थळे व सेवांचा उयायोग केल्याने किंवा त्यांवर विसंबून राहिल्याने अथवा संबंधित वस्तू, सेवा व मजकूर वापरल्याने किंवा त्यांचा वापर करण्याच्या अनुषंगाने कोणतेही नुकसान किंवा तोटा झाल्यास किंवा तसे झाल्याचा दावा केल्यास कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जवाबदार किंवा बांधील राहाणार नाही.

तुम्ही भेट देत असलेल्या कोणत्याही तृतीय पक्षाच्या संकेतस्थळ किंवा सेवांच्या नियम व अटी, तसेच गोपनीयता धोरणे तुम्ही वाचून घ्यावी असा आमचा आग्रह आहे.

तृतीय पक्ष समाज माध्यम सेवेवरून मिळालेल्या लिंक

एखाद्या तृतीय पक्ष समाज माध्यम सेवेच्या मजकूर किंवा सेवांची लिंक या सेवेदरम्यान दाखविली, समाविष्ट केली किंवा उपलब्ध केली जाऊ शकते. अशी तृतीय पक्ष समाज माध्यम सेवा ही कंपनीच्या मालकी किंवा नियंत्रणाखाली नसून कंपनी त्याची जवाबदारी घेत नाही किंवा समर्थन करीत नाही.

तुम्ही याची नोंद घेता आणि मान्य करता की अशा तृतीय पक्ष समाज माध्यम सेवेचा उयायोग केल्याने किंवा त्यात प्रवेश केल्याने अथवा संबंधित वस्तू, सेवा व मजकूर वापरल्याने किंवा त्यांचा वापर करण्याच्या अनुषंगाने कोणतेही नुकसान किंवा तोटा झाल्यास किंवा तसे झाल्याचा दावा केल्यास कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जवाबदार किंवा बांधील राहाणार नाही. एखाद्या तृतीय पक्ष समाज माध्यम सेवेचा तुम्ही केलेला उपयोग हा त्यांच्या नियम व गोपनीयता धोरणांच्या अधीन राहील.

रद्द करणे

वरील नियम व अटींचा भंग केल्यास आम्ही कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा अधीन न राहता कोणत्याही कारणास्तव कोणत्याही मर्यादेशिवाय तुमचा या सेवेतील प्रवेश रद्द किंवा खंडित करू शकतो.

असे रद्द केल्यावर तुमचा सदर सेवा वापरण्याचा अधिकार ताबडतोब बाद होईल.

अधिनतेची मर्यादा

तुम्हाला झालेले नुकसान कितीही असले, तरी या नियमांच्या कोणत्याही कलमांखालील कंपनी किंवा तिच्या पुरवठादरांची संपूर्ण अधिनता आणि वरील सर्व गोष्टींवरील तुमच्यासाठीचा उपाय हा तुम्ही या सेवेतून प्रत्यक्ष दिलेली रक्कम किंवा तुम्ही काहीच खरेदी केले नसल्यास अमेरिकन डॉलर १०० इतकाच मर्यादित राहील.

कंपनी व एखाद्या पुरवठादाराला कोणत्या नुकसानाची पूर्वकल्पना दिलेली असली आणि केलेला उपाय अपेक्षित गोष्ट साध्य करू शकला नाही, तरी लागू कायद्यानुसार जास्तीत जास्त रकमेचा विचार करता कोणत्याही परिस्थितीत कंपनी किंवा पुरवठादार हे विशेष, अनुषंगिक, अप्रत्यक्ष किंवा परिणामस्वरूप नुकसानभरपाई द्यायला बांधील नसतील (यामध्ये नफा घटण्याचे नुकसान, डेटा किंवा अन्य माहिती हरवणे, व्यवसायात खंड पडणे, शारीरिक जखम, सदर सेवा आणि / किंवा सेवेत उपयोगात आणलेले तृतीय पक्ष सॉफ्टवेअर / हार्डवेअर वापर करणे किंवा करू न शकणे यातून निर्माण झालेला गोपनीयतेचा अभाव आणि या नियमांच्या संदर्भात अन्य काही बाब यांचा किंवा अन्य काही प्रकारचाही समावेश होतो).

अनुषंगिक किंवा परिणामस्वरूप नुकसानांच्या बाबतीत काही राज्ये गर्भित हमी किंवा मर्यादित अधिनतेला वगळू देत नाहीत, ज्यामुळे वरीलपैकी काही मर्यादा लागू होणार नाहीत. अशा राज्यांमध्ये प्रत्येक पक्षकाराची मर्यादा ही कायद्याच्या अनुमतीनुसार असलेल्या जास्तीत जास्त रकमेपर्यंत सीमित राहील.

‘आहे तशी’ व ‘उपलब्धतेनुसार’ घोषणा

ही सेवा तुम्हाला ‘आहे तशी’ व ‘उपलब्धतेनुसार’ पुरविली जाते, ज्यामध्ये सर्व उणिवा व दोष हे कोणत्याही हमीशिवाय समाविष्ट आहेत. प्रचलित कायद्याच्या जास्तीत जास्त चौकटीत राहून कंपनी स्वतः आणि तिच्या सहयोगी, तसेच सर्व परवानादाते व पुरवठादार यांच्या वतीने ही घोषणा स्पष्टपणे करते. यामध्ये सेवेसंबंधीच्या सर्व हमी (ज्यामध्ये स्पष्ट, गृहीत, कायदेशीर किंवा अन्य प्रकारांचा समावेश होतो), तसेच विशिष्ट कारण, अधिकार व कायदेपालनासाठीच्या सर्व व्यवसायक्षमता व योग्यतेच्या गृहीत हमी, तसेच व्यवसाय करताना, कार्य करताना, उपयोग करताना किंवा व्यावसायिक पद्धतीचा अवलंब करताना उद्भवणाऱ्या हमी समाविष्ट आहेत. वरील बाबींपर्यंत मर्यादित न राहता कंपनी कोणतीही हमी किंवा वचन देत नाही किंवा कोणत्याही प्रकारे सांगू इच्छित नाही की दिलेली सेवा तुमच्या अपेक्षांची पूर्तता करेल, अपेक्षित परिणाम देईल, अन्य सॉफ्टवेअर, अॅप, प्रणाली किंवा सेवांच्या सोबत काम करू शकेल, व्यत्ययाशिवाय काम करू शकेल, कोणत्याही कामगिरी किंवा विश्वासार्हतेच्या मानकांची पूर्तता करेल किंवा चूकविरहित असेल किंवा कोणत्याही चुका अथवा उणिवा सुधारल्या जाऊ शकतील.

वरील बाबी विचारात न घेता कंपनी किंवा तिचे कोणतेही पुरवठादार खालीलप्रकारची कोणतीही थेट किंवा गृहीत अशी हमी किंवा दावा करीत नाहीत: १) सेवेची उपलब्धता अथवा वापर किंवा त्यावर दिलेली माहिती, मजकूर, साधने किंवा उत्पादने; २) सेवा ही अखंड किंवा चूकविरहित असेल; ३) सेवेतून पुरविलेल्या कोणत्याही माहिती किंवा मजकुराचा नेमकेपणा, विश्वासार्हता व प्रचलितपणाबद्दल; ४) कंपनी किंवा तिच्या वतीने पाठविलेल्या सेवा, सेवा पुरविणाऱ्या प्रणाली, मजकूर किंवा इ-मेल या व्हायरस, स्क्रिप्ट, ट्रोजन हॉर्स, वर्म, मालवेअर, टाईमबॉम्ब किंवा अन्य घातक घटकांपासून मुक्त असतील.

काही अधिकारक्षेत्रे ही उपभोक्त्याच्या लागू असलेल्या कायदेशीर अधिकारांबद्दल काही हमी किंवा मर्यादा वगळण्यापासून मज्जाव करू देत नाहीत. त्यामुळे वरीलपैकी सर्व किंवा काही मज्जाव किंवा मर्यादा तुम्हाला लागू होणार नाहीत. परंतु अशा परिस्थितींत लागू कायद्यानुसार या विभागात नमूद केलेले मज्जाव व मर्यादा या जास्तीत जास्त प्रमाणात लावल्या जातील.

लागू कायदा

सदर सेवेच्या वापराबद्दलचे नियम व अटी या देश / राज्याच्या कायद्यांनुसार लागू होतील, ज्यात केवळ कायदा नियमांशी होणारा संघर्ष हा अपवाद असेल. तुम्ही या अॅपचा करीत असलेला वापर हा अन्य स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अधीनही असू शकतो.

वाद निराकरण

तुम्ही हे मान्य करता की तुम्हाला सदर सेवेबद्दल कोणत्याही प्रकारची चिंता किंवा वाद असल्यास आधी तुम्ही कंपनीला संपर्क करून अनौपचारिकपणे तो मिटविण्याचा प्रयत्न कराल.

विभक्तता व हक्कत्याग

विभक्तता

वरील नियमांचा कोणताही भाग हा अंमलबजावणी अयोग्य किंवा अपात्र ठरविण्यात आला, तर तो भाग बदलून लागू कायद्याखाली त्या भागातील ध्येयांच्या पूर्ततेसाठी त्याचे जास्तीत जास्त उत्तम प्रकारे आकलन केले जाईल. उर्वरित सर्व भाग हे पूर्णपणे परिणामकारक व लागू राहतील.

हक्कत्याग

इथे नमूद केल्याव्यतिरिक्त या नियमांखाली एखादा हक्क मागायचा राहुन गेला किंवा एखादे कर्तव्य करायचे राहून गेले, तर तिथून पुढे त्या पक्षकराची तो हक्क मागण्याची क्षमता किंवा ते कर्तव्य पूर्ण करण्याची आवश्यकता ही बाधित होणार नाही. तसेच एखाद्या भंगाबद्दल हक्कत्याक केल्यास तो त्यापुढील भंगांचा हक्कत्याग ठरणार नाही.

संपर्क करा

या नियम व अटींबद्दल तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही खालील इ-मेलवर संपर्क करू शकता:
contact@urjamaharashtra.in