दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी अद्ययावत केले आहे.
ही सेवा वापरताना तुमची माहीती गोळा करणे, उपयोगात आणणे व उघड करणे यासंबंधी हे गोपनीयता धोरण आमची धोरणे व पद्धती स्पष्ट करते, तसेच तुमचे गोपनीयता हक्क व कायद्याने तुमचे होणारे रक्षण याबद्दलही सांगते.
सेवा पुरविण्यासाठी व ती सुधारण्यासाठी आम्ही तुमची माहीती उपयोगात आणतो. या गोपनीयता धोरणात नमूद केल्याप्रमाणे, तसेच जिथे संबंधित कायद्यानुसार आवश्यक आहे आणि जिथे आम्हाला तशी ठोस कायदेशीर सबब आहे, जिथे होकार दिलेला आहे (जिथे तसे आवश्यक आहे), तिथेच आम्ही तुमची माहीती गोळा करतो, उपयोगात आणतो आणि उघड करतो.
ठळक अक्षरांत लिहिलेल्या शब्दांच्या अर्थाची व्याख्या खालील परिस्थितीला धरून केलेली आहे. एकवचनी किंवा अनेकवचनी कसेही असले, तरी खालील व्याख्यांतून समान अर्थबोध होणे अपेक्षित आहे.
सदर गोपनीयता धोरणाला अनुसरून:
कंपनी (या गोपनीयता धोरणामध्ये ‘द कंपनी’, ‘आम्ही’, ‘आपण’ किंवा ‘आपले’ असा उल्लेख केलेला) याचा अर्थ होतो उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक.
कुकीज म्हणजे एखाद्या संकेतस्थळाने तुमचा संगणक, भ्रमणध्वनी किंवा अन्य उपकरणात बसविलेल्या छोट्या फाईल, ज्यांमध्ये तुम्ही त्या संकेतस्थळावर कुठे कुठे गेलात व काय उपयोग केलात याची नोंद असते.
देश / राज्य म्हणजे भारत / महाराष्ट्र.
उपकरण म्हणजे संगणक, भ्रमणध्वनी किंवी डिजिटल टॅब्लेट अशी गोष्ट, ज्याच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेतला जाऊ शकतो.
खाजगी माहीती म्हणजे एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा ओळख पटू शकेल अशा व्यक्तीची कोणतीही वैयक्तिक माहीती असू शकते.
सेवा याचा अर्थ होतो संकेतस्थळ.
सेवा पुरवठादार म्हणजे अशी व्यक्ती किंवा कायदेशीर घटक जो कंपनीच्या वतीने माहीतीवर प्रक्रिया करतो. यांमध्ये कंपनीने सेवा सादर करण्यासाठी, कंपनीच्या वतीने सेवा पुरविण्यासाठी, सेवेच्या संबंधी सेवा पुरविण्यासाठी किंवा सेवा कशी वापरली जातेय हे अभ्यासण्यासाठी कंपनीची मदत करण्यासाठी नियुक्त केलेल्या तृतीय पक्ष कंपन्या व लोकांचा समावेश होतो.
वापरातील माहीती याचा अर्थ होतो सेवा वापरण्यामुळे किंवा किंवा सेवा पायाभूत रचनेतून (उदाहरणार्थ एखाद्या पानावर व्यक्ती किती वेळ थांबली होती) आपोआप तयार झालेली माहीती.
उपभोक्ता म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती, जिला सेवा उपलब्ध आहे किंवा जी तिचा उपयोग करते.
संकेतस्थळ म्हणजे उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धकचे संकेतस्थळ: https://urjamaharashtra.in/
तुम्ही म्हणजे ती व्यक्ती, जी या सेवेचा लाभ घेतेय किंवा उपयोग करतेय किंवा लागू होत असल्यास एखादी कंपनी किंवा कायदेशीर घटक, ज्याच्या वतीने अशी व्यक्ती या सेवेचा लाभ घेतेय किंवा उपयोग करतेय.
आमच्या सेवेचा उपयोग करताना आम्ही तुमची ओळख पटविणारी काही माहीती मागू शकतो, जिचा उपयोग तुमच्याशी संपर्क करण्यासाठी केला जाऊ शकतो. ओळख पटविणाऱ्या माहीतीमध्ये खालील माहीतीचा समावेश असू शकतो, तसेच अन्य माहीतीही असू शकते:
सेवेचा वापर करताना अशाप्रकारची माहीती आपोआपच गोळा केली जाते.
अशा माहीतीमध्ये तुमच्या उपकरणाचा माहीतीमहाजाल प्रोटोकॉल पत्ता (आयपी), ब्राऊझर प्रकार, ब्राऊझर आवृत्ती, आमच्या सेवेची तुम्ही भेट दिलेली पाने, तुम्ही भेट दिलीत ती वेळ व दिनांक, प्रत्येक पानावर घालविलेला वेळ, विशिष्ट उपकरण शोधक आणि अन्य सूचक माहीतीचा समावेश होतो.
जेव्हा तुम्ही ही सेवा एखाद्या भ्रमणध्वनीतून किंवा त्या माध्यमातून घेता, तेव्हा आम्ही काही माहीती आपोआप गोळा करू शकतो, जसे की तुम्ही वापरत असलेल्या भ्रमणध्वनीचा प्रकार, तुमच्या भ्रमणध्वनी संचाचा विशिष्ट क्रमांक, त्याचा आयपी पत्ता, तुमची भ्रमणध्वनी ऑपरेटिंग प्रणाली, तुम्ही वापरात असलेला माहीतीमहाजाल ब्राऊझर, विशिष्ट उपकरण शोधक व अन्य सूचक माहीती.
तसेच आमची सेवा घेताना किंवा तिथे भ्रमणध्वनी वापरून प्रवेश करताना तुमचा ब्राऊझर जी माहीती पाठवितो, तीही आम्ही गोळा करू शकतो.
आम्ही कुकीजसारखे मागोवा तंत्रज्ञान वापरून हालचालींचा मागोवा घेत सेवा सुधारण्याचा प्रयत्न करतो. आम्ही वापरात असलेल्या तंत्रज्ञानात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
कुकीज ‘कायमस्वरूपी’ किंवा ‘सत्रमर्यादित’ असू शकतात. तुम्ही ऑफलाईन गेलात, तरी कायमस्वरूपी कुकीज तुमच्या संगणक किंवा भ्रमणध्वनीवर राहतात, तर ज्या क्षणी तुम्ही ब्राऊझर बंद करता, तेव्हा सत्रमर्यादित कुकीज काढून टाकल्या जातात.
कायद्यानुसार आवश्यक असल्यास केवळ तुमच्या संमतीने आम्ही वैकल्पिक कुकीज वापरतो (ज्या खाली उल्लेख केकेल्या अत्यावश्यक कुकीजपेक्षा भिन्न असतात). आमचे कुकी निवड साधन (उपलब्ध असल्यास) वापरून किंवा तुमच्या ब्राऊझर / उपकरणाच्या सेटिंग्ज मध्ये जाऊन तुम्ही हवे तेव्हा अनुमती रद्द करू शकता किंवा बदलू शकता. अशाप्रकारे रद्द केल्याने तत्पूर्वीच्या संमतीवर आधारित कार्य हे बेकायदेशीर होत नाही.
खालील कारणांसाठी आम्ही ‘कायमस्वरूपी’ व ‘सत्रमर्यादित’ कुकीज वापरतो:
अत्यावश्यक कुकीज
प्रकार: सत्रमर्यादित कुकीज
नियंत्रक: आम्ही
हेतू: संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सेवा पुरविण्यासाठी व तुम्हाला त्यावरील काही सुविधा वापरता येण्यासाठी या आवश्यक आहेत. उपभोक्त्यांची ओळख पटविणे व त्यांच्या खात्यांचा तोतया वापर थांबविण्यासाठी याचा उपयोग होतो. या कुकीजखेरीज तुम्ही मागत असलेल्या सेवा पुरविणे शक्य नाही आणि त्याच पुरविण्यासाठी आम्ही या कुकीजचा अवलंब करतो.
कुकीज धोरण / कुकीज स्वीकार सूचना
प्रकार: कायमस्वरूपी कुकीज
नियंत्रक: आम्ही
हेतू: या कुकीजच्या साहाय्याने हे समजते की संकेतस्थळावरील कुकीज उपभोक्त्यांनी स्वीकारल्या आहेत की नाही, तसेच तुम्ही स्वीकारलेल्या पर्यायांची नोंद घेतली जाते, जेणेकरून तुमच्या पुढच्या भेटीदरम्यान त्या निवडीचा मान राखता येईल.
आमची सेवा पुरविणे व टिकवून ठेवण्यासाठी, ज्यामध्ये सेवेच्या वापराचा मागोवा घेणेही येते
तुमच्या खात्याचे व्यवस्थापन करणे: सेवेचा उपभोक्ता म्हणून तुमच्या नोंदणीचे व्यवस्थापन करणे – तुम्ही पुरवित असलेल्या खाजगी माहीतीमुळे सेवेच्या अनेक पैलूंचा तुम्हाला लाभ घेता येतो, ज्या एक नोंदणीकृत उपभोक्ता म्हणून तुम्हाला उपलब्ध आहेत.
एखाद्या कराराचे पालन करणे: यामध्ये तुम्ही करार करून विकत घेतलेली उत्पादने, वस्तू किंवा सेवा, तसेच या सेवेच्या माध्यमातून आमच्याशी केलेल्या एखाद्या अन्य कराराची प्रगती, पालन व हमी समाविष्ट होते.
तुमच्याशी संपर्क करणे: विविध सुविधा, उत्पादने व करार केलेल्या सेवांबद्दल इ-मेल, भ्रमणध्वनी, एसएमएस किंवा अॅपसारख्या अन्य इलेक्ट्रोनिक माध्यमातून तुमच्याशी संपर्क करणे किंवा प्रसिद्धी करण्यासाठी उपयुक्त, ज्यामध्ये आवश्यक व वाजवी असेल तिथे सुरक्षितता सूचनांचे पालन करणे, हेही समाविष्ट होते.
तुम्हाला बातम्या, विशेष सवलती आणि तुम्ही या आधीच विकत घेतलेल्या किंवा चौकशी केलेल्या आमच्या वस्तू, सेवा किंवा कार्यक्रमांसारख्या अन्य गोष्टींबद्दल सामान्य माहीती देणे – लागू कायद्यानुसार चालते तिथेच आम्ही असे विपणन संभाषण करतो, जिथे पूर्वसंमती आवश्यक असते (उदाहरणार्थ, इइए व युके या क्षेत्रांत लागू असलेल्या कायद्यांनुसार). आम्ही असा संपर्क केवळ तुमच्या संमतीनेच करतो किंवा तुम्ही नकार देईपर्यंतच आम्ही करतो. कोणत्याही विपणन इ-मेलमधील अनसबस्क्राइब लिंकवर क्लिक करून किंवा आमच्याशी संपर्क करून तुम्ही कधीही यातून बाहेर पडू शकता किंवा तुमची संमती नाकारू शकता.
तुमच्या विनंत्यांचे नियोजन करण्यासाठी: तुम्ही केलेल्या विनंत्या हाताळण्यासाठी
व्यवसाय हस्तांतरणासाठी: आमच्या सर्व किंवा काही मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण, तसेच विलीनीकरण, भाग विक्री, पुनर्रचना, पुनर्व्यवस्थापन किंवा विघटन यांचे अवलोकन किंवा कृती करण्यासाठीही आम्ही तुमची खाजगी माहीती वापरू शकतो. हे चालू व्यवहारात किंवा दिवाळखोरी, परीसमापन किंवा तत्सम कारवाईसाठी असू शकते, ज्यामध्ये आमच्या सेवा ग्राहकांची खाजगी माहीती हस्तांतरित झालेल्या मालमत्तेचा भाग असते.
अन्य कारणांसाठी: आम्ही तुमची माहीती ही अन्य कारणांसाठी वापरू शकतो, जसे की माहीती पृथःकरण, उपयोगाच्या पद्धती समजून घेणे, आमच्या प्रचार मोहिमांची परिणामकारकता समजून घेणे आणि आमच्या सेवा, उत्पादने, विपणन व तुमच्या अनुभवांचे मुल्यांकन करून सुधार करणे.
खालील परिस्थितींत आम्ही तुमची खाजगी माहीती इतरांना देण्याची शक्यता आहे:
पुरवठादार: आमच्या सेवेचा उपयोगाचे निरीक्षण व मूल्यमापन करण्यासाठी आणि तुमच्याशी संपर्क करण्यासाठी आम्ही तुमची खाजगी माहीती सेवा पुरवठादारांना देऊ शकतो.
व्यवसाय हस्तांतरण: विलीनीकरण, कंपनीच्या मालमत्तेची विक्री, वित्तिय साहाय्य किंवा आमच्या व्यवसायाची दुसऱ्या कंपनीतर्फे अंशतः किंवा पूर्ण खरेदी अशा वाटाघाटी किंवा त्यासंबंधीच्या कामांमध्ये आम्ही तुमची खाजगी माहीती दुसऱ्याला देऊ किंवा हस्तांतरित करू शकतो.
सहयोगी: आमच्या सहयोगींना आम्ही तुमची खाजगी माहीती देऊ शकतो, ज्यावेळी हे गोपनीयता धोरण आम्ही त्यांच्याकडून मान्य करवून घेऊ. सहयोगींमध्ये आमची मूळ कंपनी किंवा एखादी अंकित कंपनी, संयुक्त उपक्रम भागीदार, आमच्या नियंत्रणाखाली असलेल्या अन्य कंपन्या किंवा ज्यांवर आमचा सामायिक ताबा आहे यांचा समावेश होतो.
अन्य उपभोक्ता: जर आमची सेवा ही सार्वजनिक ठिकाणीही असेल, जिथे तुम्ही खाजगी माहीती पुरविता किंवा अशा ठिकाणी अन्य उपभोक्त्यांशी संपर्क करता, तेव्हा अशी माहीती सर्व उपभोक्त्यांना दिसू शकते आणि या सेवेच्या बाहेरही खुल्याने वितरीत होऊ शकते.
तुमच्या अनुमतीने: अन्य कोणत्याही कारणासाठी तुमच्या अनुमतीने आम्ही तुमची खाजगी माहीती इतरांना देऊ शकतो.
या गोपनीयता धोरणात नमूद केलेल्या कारणांसाठी कंपनी तुमची खाजगी माहीती आवश्यक असेल तेवढाच वेळ साठवून ठेवेल. आम्ही तुमची खाजगी माहीती जेवढी आवश्यक असेल, तितकीच साठवून वापरू, ज्यातून आमच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करता येईल (जसे की लागू कायद्यांनुसार तुमची माहीती साठवून ठेवणे बंधनकारक असल्यास), वादांचे निवारण करता येईल आणि आमचे कायदेशीर करार व धोरणे राबविता येतील.
जिथे शक्य असेल तिथे आम्ही कमी काळासाठी माहीती साठवितो आणि / किंवा माहीती रद्द, एकत्रित किंवा बेमालूम करून ओळख पटविणे अवघड करतो. अन्य कालखंड दिला नसल्यास खालील नमूद केलेल्या वेळा या ‘जास्तीत जास्त’ अशा स्वरूपाच्या असून जेव्हा आवश्यक कारणासाठी माहीती अनावश्यक होईल, तेव्हा आम्ही ती रद्द किंवा बेमालूम करू शकतो. विविध प्रकारच्या खाजगी माहीतीसाठी आम्ही वेगवेगळे साठवणूक कालखंड अंमलात आणतो, जे त्याचे पृथःकरणाचे कारण व कायदेशीर बंधानांवर अवलंबून असते.
खातेसंबंधी माहीती:
वापरासंबंधीची माहीती:
संकेतस्थळ पृथःकरण माहीती (कुकीज, आयपी पत्ते, उपकरण ओळख साधन): गोळा केल्यापासून २४ महिन्यांपर्यंत साठविली जाते, ज्यामुळे आम्हाला चालू पद्धती समजून घेता येतात, तसेच गोपनीयता तत्त्वांचा मान राखता येतो.
र्व्हर नोंदी (आयपी पत्ते, उपयोगाच्या वेळा): सुरक्षिततेच्या कारणास्तव व समस्या निवारणासाठी २४ महिन्यांपर्यंत साठविली जाते.
वर नमूद केलेल्या साठवणुकीच्या कालखंडांनुसार वापरासंबंधीची माहीती राखून ठेवली जाते आणि सुरक्षितता, घोटाळा प्रतिबंध किंवा कायदेशीर बाबींसाठीच केवळ आवश्यकतेनुसार अधिक काळ साठविली जाईल.
आम्ही विविध कारणांसाठी वर नमूद केलेल्या कालखंडापेक्षा जास्त वेळ खाजगी माहीती साठवून ठेवू शकतो:
कायदेशीर बंधने: काही प्रकारची माहीती कायद्यानुसार राखणे आवश्यक असते (कर अधिकाऱ्यांसाठी आर्थिक नोंदी)
कायदेशीर दावे: कायदेशीर दावे साबित करणे, अंमलात आणणे व लढविण्यासाठी माहीती आवश्यक असते
तुमची स्पष्ट विनंती: तुम्ही विशिष्ट माहीती साठवून ठेवण्याची आम्हाला विनंती करता
तांत्रिक बंधने: कालांतराने रद्द करण्यासाठी पर्यायी साठवणूक प्रणालींत माहीती साठविलेली असते
आमच्याशी संपर्क करून तुम्ही तुमची खाजगी माहीती आम्ही किती काळ साठवून ठेवणार याची चौकशी करू शकता.
जेव्हा राखून ठेवण्याचा कालखंड संपुष्टात येतो, तेव्हा आम्ही खाजगी माहीती खालील पद्धतींनी सुरक्षितपणे रद्द किंवा बेमालूम करतो:
रद्द करणे: आमच्या प्रणालींमधून खाजगी माहीती काढून टाकली जाते आणि सक्रीयपणे वापरली जात नाही.
पर्यायी साठवणूक: विशिष्ट काळासाठी सांकेतिक पर्यायी साठवणुकीत उर्वरित प्रती शिल्लक असू शकतात, ज्या आमच्या पर्यायी साठवणूक वेळापत्रकाला धरून असतात. सुरक्षितता, संकट निवारण किंवा कायदेशीर बाबींव्यतिरिक्त अशा प्रती पुनर्रुजीवीत केल्या जात नाहीत.
बेमालूम करणे: काही बाबतीत आम्ही खाजगी माहीतीचे बेमालूम सांख्यिकी माहीतीत रूपांतरण करतो, ज्यातून कोणी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अशी बेमालूम केलेली माहीती संशोधन व मूल्यमापनासाठी अनंतकाळ साठवून ठेवली जाऊ शकते.
कंपनीचे कामकाज कार्यालय आणि संबंधीत प्रक्रियेतील सहयोगी असतील त्या ठिकाणी तुमच्या खाजगी माहीतीसहित अन्य महितीवर प्रक्रिया केली जाते. याचा अर्थ असा होतो की ही माहीती तुमचे राज्य, प्रांत, देश किंवा अन्य शासकीय अखत्यारीच्या बाहेर हस्तांतरित होऊन तिथे राखली जाऊ शकते, जिथे माहीती संरक्षण कायदे तुम्ही राहत असलेल्या अखत्यारीपेक्षा भिन्न असू शकतात.
जिथे लागू कायद्यामुळे आवश्यक ठरेल, तिथे तुमच्या खाजगी माहीतीचे आंतरराष्ट्रीय हस्तांतरण हे योग्य सुरक्षिततेत व गरज पडेल तिथे पूरक योजनांमधून केले जाईल याची आम्ही खात्री करू. तुमची माहीती सुरक्षितरित्या हाताळली जाईल हे पाहण्यासाठी कंपनी सामान्यपणे आवश्यक असलेली व या गोपनीयता धोरणाला अनुसरून पावले उचलेल. पुरेसे नियंत्रण अस्तित्वात असल्याशिवाय तुमची कोणतीही खाजगी माहीती ही एखाद्या संस्था किंवा देशात हस्तांतरित केली जाणार नाही, ज्यामध्ये तुमची माहीती व खाजगी माहीतीची सुरक्षितताही समाविष्ट असेल.
आम्ही तुमच्याकडून जमा केलेली खाजगी माहीती रद्द करण्याचा किंवा आम्हाला रद्द करण्याची विनंती करण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
सेवेच्या आतमधूनच तुमच्याबद्दलची काही माहीती रद्द करण्याची क्षमता तुम्हाला या सेवेतूनच मिळण्याची शक्यता आहे.
तुम्ही तुमच्या खात्यात लॉगीन करून (लॉगीन असेल तर) हवे तेव्हा तुमची माहीती अद्ययावत, सुधारित किंवा रद्द करू शकता. त्यामध्ये खाते सेटिंग्ज या विभागात जाऊन तुम्ही खाजगी माहीतीचे नियंत्रण करू शकता. तुम्ही आम्हाला दिलेली कोणतीही खाजगी माहीती सुधारित किंवा रद्द करण्यासाठी तुम्हाला त्यात प्रवेश देण्याची विनंती करू शकता.
परंतु याची दाखल कृपया घ्यावी की काही माहीती आम्हाला राखून ठेवावी लागेल, जिथे काही कायदेशीर बंधने असतील किंवा कायदेशीर आधार असेल.
जर कंपनीचे विलीनीकरण, संपादन किंवा मालमत्ता विक्री होत असेल, तर तुमची खाजगी माहीती हस्तांतरित होऊ शकेल. तुमची खाजगी माहीती हस्तांतरित होऊन दुसऱ्या एखाद्या गोपनीयता धोरणाचा भाग होण्याआधी आम्ही तुम्हाला कळवू.
काही विशिष्ट परिस्थितींत कंपनी तुमची खाजगी माहीती इतरांना सांगेल, जर तसे करणे हे कायद्याने बंधनकारक असेल किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या न्याय्य विनंतीला उत्तर म्हणून असेल (उदाहरणार्थ एखादे न्यायालय किंवा सरकारी विभाग).
तुमची खाजगी माहीती कंपनी इतरांना तसे करणे आवश्यक असल्यास त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून खालील प्रसंगांत देईल:
तुमच्या खाजगी माहीतीची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे, पण हे लक्षात घ्या की माहीतीमहाजालावरील संदेशवहनाची किंवा इलेक्ट्रोनिक साठवणुकीची कोणतीही पद्धत ही १००% सुरक्षित नसते. तुमच्या माहीतीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही व्यावसायिकदृष्ट्या शक्य असलेल्या पद्धती वापरण्याचा प्रयत्न करीत असलो, तरी त्याच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही.
वय वर्षे १६ पेक्षा कमी असलेल्या व्यक्तींसाठी ही सेवा पुरविलेली नसून आम्ही ज्ञातपणे अशा लोकांकडून खाजगी माहीती गोळा करीत नाही.
तुम्ही पालक किंवा काळजीवाहू असाल, तर तुमच्या पाल्याने आम्हाला खाजगी माहीती दिल्याचे निदर्शनास आल्यावर आमच्याशी संपर्क करा. आमच्या हे जर लक्षात आले की १६ वर्षेपेक्षा लहान व्यक्तीकडून आम्ही खाजगी माहीती गोळा केली आहे, तर आमच्या सर्व्हरवरून ती माहीती काढून टाकण्याचा आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू.
काही देश व राज्यांमध्ये स्वतःच्या खाजगी माहीतीची प्रक्रिया करण्याची अनुमती व्यक्ती कोणत्या वयाला देऊ शकते, हे वय अधिक असू शकते. जिथे आम्ही कायदेशीर होकार या नात्याने विसंबून राहतो, तिथे लागू कायदा वय वर्षे १६ पेक्षा जास्त असे नमूद करतो. अशा उपभोक्त्याची माहीती जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यापूर्वी आम्हाला त्याचे पालक किंवा काळजीवाहूचा होकार लागेल.
आम्ही चालवित नसलेल्या संकेतस्थळांच्या लिंक आमच्या सेवेमध्ये असू शकतात. तुम्ही जर अशा तृतीय पक्षीय लिंकवर क्लिक केलेत, तर तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर नेले जाईल. तुम्ही भेट देत असलेल्या प्रत्येक संकेतस्थळाचे गोपनीयता धोरण तुम्ही वाचावे असा आमचा आग्रह आहे.
तृतीय पक्षीय संकेतस्थळे किंवा त्यांच्या सेवांमधील मजकूर, गोपनीयता धोरणे व पद्धतींवर आमचे काहीही नियंत्रण नसून आम्ही त्यांची जबाबदारी घेत नाही.
आम्ही वेळोवेळी आमचे गोपनीयता धोरण बदलू शकतो. या पानावर नवे धोरण प्रकाशित करून आम्ही तुम्हाला त्याची माहीती देऊ.
असे बदल लागू होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला इ-मेल आणि / किंवा या सेवेतून ठळकपणे याबद्दल सांगू, तसेच या गोपनीयता धोरणाच्या वरील भागात कधी अद्ययावत केले ती तारीख बदलू.
केलेले काही बदल समजावे म्हणून तुम्ही वेळोवेळी हे गोपनीयता धोरण वाचावे असा आमचा सल्ला आहे. या पानावर बदल केल्यापासून या गोपनीयता धोरणातील बदल लागू होतील.
या गोपनीयता धोरणाबद्दल तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही खालील इ-मेलवर संपर्क करू शकता:
©2026 उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक. सर्व हक्क सुरक्षित.
Vistaar Digital तर्फे निर्मिती व देखभाल