उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक

प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज

अधिक माहिती

अटल प्रतिभा पोषण केंद्र–रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (एआयसी-आरएमपी)

नीति आयोगाच्या अटल इन्होवेशन मिशन अंतर्गत स्थापन झालेली एआयसी-आरएमपी ही संस्था मार्गदर्शन, प्रशिक्षण व वित्तिय साहाय्यतेच्या माध्यमातून ग्रामीण व निम-शहरी उद्योगांना मदत करते.

लक्ष्य:

aic-logo

विशेष कामगिरी:

0 +

नवव्यवसायांचे पोषण (३०+ महिला संचालित नवव्यवसाय)

0 +Cr.

नवव्यावसायिकांना निधी (बाह्य) उभारण्यात यश

0 +

परस्परपूरक स्थानिक व राष्ट्रस्तरीय उपक्रम

0 +

कंपन्यांशी भागीदारी

0 +

गुंतवणूक भागीदार

0 +

मार्गदर्शक

0 +

रोजगारांची निर्मिती

0 +

शैक्षणिक भागीदार

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम)

डे-एनआरएलएम अंतर्गत महाराष्ट्रात २०११ पासून उमेद उपक्रम राबविण्यात येत आहे.

शाश्वत उदरनिर्वाह पर्यायांतून गरीब व असुरक्षित ग्रामीण कुटुंबांचा उद्धार करणे हे सदर उपक्रमाचे ध्येय आहे.

सदर उपक्रम ३४ जिल्हे, ३५१ तालुके व सर्व ग्राम पंचायतींमध्ये कार्यरत असून ७१ लाखांहून जास्त लोकांचे जीवन सुधारत आहे.

महिला सक्षमीकरण व उद्योजकता

आर्थिक सेवा, कौशल्य विकास, व्यवसाय साहाय्य व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन उमेद हा उपक्रम बचत गट, ग्राम संघटना व उत्पादक गटांना सक्षम करतो.

Maharasthra-State-Rural-Livelihood-Mission

महाराष्ट्रभरात दिसलेले परिणाम

जिल्हे
0 +
तालुके
0 +
लाभार्थी
0 M+
महिला बचत गट
0 K+
महिला संचालित उद्योग
0 K+

दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डे-एनआरएलएम)

ग्रामविकास मंत्रालयातर्फे राबविण्यात येणारा दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डे-एनआरएलएम) हा ग्रामीण गरिबी हटविण्यासाठीचा भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे. हे अभियान ग्रामीण परिवारांना – विशेषतः त्यातील महिला – बचत गट किंवा संबंधित संघात समाविष्ट करून घेऊन त्यांची एकत्रित शक्ती, निधी उपलब्धता व निर्णयक्षमता वर्धित करते. हे अभियान बँक कर्ज, कौशल्ये, व्यवसाय विकास, शाश्वत स्वयंरोजगार आणि कुशल वेतन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देऊन परिवाराचे उत्पन्न व उदरनिर्वाह सशक्त करायला मदत करते. महाराष्ट्रात उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (एमएसआरएलएम) माध्यमातून डे-एनआरएलएम राबविला जातो.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

सन १९८२ मध्ये स्थापन झालेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही एक विश्वस्त संस्था असून लोकप्रतिनिधी, समाजसेवक, संस्था, उद्योजक, नवउद्योजक, कंपन्या आणि तरुणांसोबत कार्य करणारी एक अग्रगण्य नेतृत्व व क्षमता विकास संघटना आहे. ठाणे जिल्ह्यात मुख्यालय असलेल्या प्रबोधिनीने मुंबई, पुणे व दिल्ली येथील कार्यालयांतून राष्ट्रीय स्तरावर काम करून ६०,००० पेक्षाही

जास्त संबंधित व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे आणि सामाजिक, ग्रामीण, प्रशासकीय व उद्योजकीय आव्हानांवर उत्तरे शोधण्यासाठी संशोधन व जनजागृती उपक्रम राबविले आहेत.

प्रबोधिनीला संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेसोबत विशेष सल्लागार दर्जा असून यशदा, हिपा, एनएसडीसी आणि गांधी स्मृती व दर्शन समितीसारख्या संस्थांसोबत धोरणात्मक भागीदारी सुद्धा आहे. इंडियन इंस्टीट्युट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप आणि ज्ञान नैपुण्य केंद्रासारख्या उपक्रमांतून संस्था लोकशाही नेतृत्व, नवनिर्मिती, उद्योजकता आणि मोठ्या प्रमाणावरील प्रशिक्षण कार्यक्रमांना प्रोत्साहन देते.

RMP-Logo

अटल इन्होव्हेशन मिशन (एआयएम)

नवनिर्मिती व उद्योजकतेची विचारसरणी निर्माण करण्यासाठी अटल इन्होव्हेशन मिशन हे भारत सरकारचे मुख्य अभियान आहे. तंत्रज्ञान आधारित क्षेत्रांमध्ये मिशन जागतिक दर्जाची नवनिर्मिती केंद्रे, ग्रँड चॅलेन्जेस, नवउद्योग आणि स्वयंरोजगार प्रयत्नांना प्रोत्साहन देते.

niti_aayog_aim

ध्येये:

नवनिर्मितीला प्रोत्साहन

देशभर सर्जनशीलता व संशोधनाला प्रोत्साहन देणे

उद्योजकता विकास

तरुणांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सक्षम करणे

प्रतिभा पोषण केंद्रांची निर्मिती

नवउद्योगांना मार्गदर्शन व निधी उपलब्ध करून देणे

साहाय्य वाढविणे

जास्तीचा निधी पुरवून असलेल्या प्रतिभा पोषण केंद्रांना सशक्त बनविणे

ग्रामविकास मंत्रालय

भारत सरकारचे ग्रामविकास मंत्रालय हे ग्रामीण विकास व गरिबी निर्मुलनासाठी काम करते. ग्रामीण भागांत आर्थिक विकासाला चालना देणे व लोकांचे राहाणीमान सुधारणे ही त्यांची ध्येये आहेत.

प्रमुख उद्दिष्टे

Ministry_of_Rural_Development

मुख्य योजना

एमजीएनरेगा

ग्रामीण नागरिकांना १०० दिवसांची रोजगार हमी देणे

पीमे

गरीब कुटुंबांना मोफत घरे पुरविणे

पीएमजीएसवाय

बारमाही रस्त्यांनी गावे एकमेकांना जोडणे