उमेद ग्रामीण जीवनोन्नती वेगवर्धक

प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज
प्रारंभिक टप्पा - अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज

ऊर्जा – महाराष्ट्रातील ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी एक नवीन अध्याय

दिनांक: ८ सप्टेंबर २०२६

स्थळ: RMP कार्यालय, प्रभादेवी, मुंबई

उर्जा – उमेद ग्रामीण जीवनोन्नती प्रवेगक या उपक्रमासाठी हा एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण ठरला. २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (RMP) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (AGM) महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ऊर्जा माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

या विशेष प्रसंगी RMP चे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि AIC-RMP चे संचालक श्री. श्रीकांत बडवे, RMP चे सचिव श्री. विनोद पवार, RMP चे कार्यकारी संचालक श्री. अभिराम घड्याळपाटील आणि AIC-RMP चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. उदय वानखवाला यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी ऊर्जाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण महिला उद्योजकतेला बळकटी देणे, ग्रामीण उद्योगांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्रभर अर्थपूर्ण व शाश्वत परिवर्तन घडवून आणणे या ऊर्जाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

ऊर्जाच्या माध्यमातून ग्रामीण महिला उद्योजकांना सक्षम करण्याचा आमचा संकल्प आहे. योग्य परिसंस्था, ज्ञान, मार्गदर्शन आणि विविध संधी उपलब्ध करून देत ग्रामीण महिलांना शाश्वत उद्योग उभारण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी आणि उद्योजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी आम्ही सहकार्य करू इच्छितो.

ग्रामीण महिलांच्या उद्योजकीय क्षमतेला नवी दिशा देत, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान अधिक सक्षम करण्यासाठी ऊर्जा कटिबद्ध आहे.

कार्यक्रम छायाचित्र संग्राह: ऊर्जा – महाराष्ट्रातील ग्रामीण महिला उद्योजक